23 ते 25 मार्च 1973 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक नागपूर येथील केंद्र कार्यालयात झाली. त्या काळात श्रीगुरूजींची प्रकृती खूप चिंताजनक होती, त्यामुळे ते बैठकीत पूर्ण वेळ उपस्थित राहू शकले नाहीत. बैठकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे प्रतिनिधींपुढे 40 मिनिटे भाषण झाले. बोलताना त्यांना खूप त्रास होत होता. एक-दोन वाक्ये उच्चारली की श्वास लागावयाचा, खोकला यावयाचा. तरीही त्यांनी आपल्या नेहमीच्या पध्दतीनुसार ओघवते विचार मांडले. स्वयंसेवकांपुढे त्यांचे हे अखेरचेच भाषण ठरले.